Sunday, July 17, 2016

माया

माया आईची मऊ साईची
फुल जाईची अति कोमल
माया पित्याची वारसा देण्याची
छाया घरट्याची निरंतर
माया भावाची पाठ राखायची
भाऊबीज घालायची प्रेमभावे
माया बहिणीची राखी बांधायची
प्रेम जपण्याची आनंद मानण्याची
माया आजीची खाऊ घालायची
कौतुक करायची नातं नातवाची
माया आजोबांची गोष्ट सांगण्याची
धाडस शिकवायची आदर्श ठेवायची
माया आत्याची लाड करायची
सोहळे पुरवायची हौस भारी
माया मावशीची गुपित सांगण्याची
हितगुज करायची थट्टा मस्करीची
माया मामाची  कामी येण्याची
साद प्रेमाची पाखर घाली
माया मैत्रीची गुजगोष्टी करायची
अल्लड प्रेमाची साक्ष देई
माया सजनाची स्वप्ने रंगवायची
प्रेम उधळायची एकमेकांवरी
माया गुरुरायाची भक्ती शिकवायची
भेट घडवून द्यायची परमेशाची

No comments:

Post a Comment