Tuesday, July 26, 2016

विमानप्रवास

एकदा वाटले मला
करावा विमानप्रवास
पैसे जमवले भरपूर
पण अनुभव नव्हता खास
 तिकीट गेले काढायला
पहिली मोठी रांग
फॉर्म घेतला भरायला
पण लागत नव्हता थांग
मदत मागितली शेजाऱ्याची
नकारघंटा आली
कसातरी चुकत माकत
आरक्षण अर्ज भरला जरी
लवकरच लागला नंबर
आनंदात घर गाठले तरी
तयारी झाली सुरू
कपड्यालत्त्याची मस्त
पण बिलाचा पहिला आकडा
पैशाची धुलाई जास्त
बॅगा नवीन आणल्या
पण सामान  झाले जास्त
वजन कमी करण्यास
केली मोठी शिकस्त
तयारी झाली सारी
जामानिमा  मस्त
एकदा पोचली स्वारी
विमानतळावर स्वस्थ
खातर जमा सामानाची
ठाकठीक झाली
आता लागली उत्सुकता
विमानात प्रवेश करायची
घोषणा झाली सुरु
विमान रद्द झाल्याची
धुक्याने मारली बाजी
निराशा झाली सर्वांची
उत्सुकतेचा फुटला फुगा
हादरा देऊन सुस्त
अशी झाली कथा
विमानप्रवासाची मस्त





पु ल देशपांडे

पु ल आमचे हरहुन्नरी
विनोदात बाजी मारली खरी
विनोदी बाण्यात साऱ्यांची गणती
सामन्यात राहून असामान्य होती
तनमन अर्पिती सर्वांसाठी
चैनीवरी कधी केली नाही प्रीती
चांगल्यासाठी सदा उत्सुक आतुर
सर्वांशी मैत्री केली आजवर
साहित्य संगीत नाटक सिनेमा
सर्वात मशहूर तरी स्वतंत्र बाणा
सारख्याच मस्तीने सर्वात रमले
पण ग च्या बाधेपासून मुक्त राहिले
कलेसाठी छंदासाठी केले प्रेम अपरंपार
धनाची सत्कर्मी उधळण करून
केला जोहार
उत्तमाच्या संचयाने
पुरुषोत्त्तम झाले
 कीर्तिरूपाने अमर झाले

इंद्रधनुष्य

इंद्रधनू नभी अवतरले
सारे रंग प्रकटले
रंगांची ती प्रेमळ एकी
आदर्शाचा दाखल राखी
प्रत्येकाची ओळख वेगळी
समानतेचा गुण दाखवी
पांढरा शांत पावित्र्याचा
केशरि धैर्य हौतात्म्याचा
हिरवागार समृद्धीचा
लालचुटुक चैतन्याचा
पिवळाधमक परिपक्वतेचा
निळा मंद आकाशाचा
सारे असती फार गुणी
इंद्रधनुष्य एकवटूनी

Sunday, July 17, 2016

माया

माया आईची मऊ साईची
फुल जाईची अति कोमल
माया पित्याची वारसा देण्याची
छाया घरट्याची निरंतर
माया भावाची पाठ राखायची
भाऊबीज घालायची प्रेमभावे
माया बहिणीची राखी बांधायची
प्रेम जपण्याची आनंद मानण्याची
माया आजीची खाऊ घालायची
कौतुक करायची नातं नातवाची
माया आजोबांची गोष्ट सांगण्याची
धाडस शिकवायची आदर्श ठेवायची
माया आत्याची लाड करायची
सोहळे पुरवायची हौस भारी
माया मावशीची गुपित सांगण्याची
हितगुज करायची थट्टा मस्करीची
माया मामाची  कामी येण्याची
साद प्रेमाची पाखर घाली
माया मैत्रीची गुजगोष्टी करायची
अल्लड प्रेमाची साक्ष देई
माया सजनाची स्वप्ने रंगवायची
प्रेम उधळायची एकमेकांवरी
माया गुरुरायाची भक्ती शिकवायची
भेट घडवून द्यायची परमेशाची

झुला

झुलतो झुला स्वछंदी
मुले होती आनंदी
गप्पांच्या झडती फैरी
मजेने हसती सारी
गतस्मृतींच्या आठवणी
मोहरती तनमनी
खुशीत रमती गाती
हर्षोल्हासें बागडती
गाणी गोष्टी चुटकुले
कोडी गमतीत मजा खुले
कथा चुटकुले विनोदही
साहित्य आणि कविताही
सारे डोलती सहीसही
वेळेचे तर भानच नाही
गुजगोष्टीत सारी डुलती
झुल्यासम खाली वरती